पुणे

कोपरगाव मंत्री राठोड

CD

KPG26B10943
विवेक कोल्हे
-----------
जलसंधारणासाठी गावनिहाय निधी द्यावा
विवेक कोल्हे यांचे मंत्री संजय राठोड यांना निवेदनाद्वारे साकडे
कोपरगाव, ता. ९ ः पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या कोपरगाव तालुक्यात कमी व अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र गावनिहाय मृद व जलसंधारण विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आमदार विवेक कोल्हे यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना घातले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास मंत्री संजय राठोड यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ऊसतोड मजुरांसमवेत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी आमदार कोल्हे यांनी त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले. मंत्री राठोड यांनी केलेल्या मागणीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
निवेदनात आमदार कोल्हे यांनी तालुक्यातील पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे. शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावनिहाय नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट व माती नाला बांधांची उभारणी, पाझर तलाव व लघु जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन तसेच जलसाठ्यांमधील गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. शेततळे व जलपुनर्भरण संरचनांची निर्मिती, सलग समतल चर, समतल बांध आणि समोच्च रेषांवरील बांधबंदिस्ती यांसारखी कामे करून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
-----------
आराखडा तयार करून कामांना मंजुरी द्या
प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करावा. प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार कोल्हे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News: ऊस दरासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, तीन तासापासून रास्तारोको सुरू

Viral Video : चेकिंगदरम्यान पोलिसाने इन्फ्लुएंसरकडे मागितले दिवाळी गिफ्ट, VIDEO VIRAL; लोक म्हणाले- ही तर खुलेआम लूट

Cyber Fraud: शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून ; ज्येष्ठाला १ कोटी ७ लाखांचा गंडा

''तेव्हा इब्राहिम नावाच्या व्यक्तीनं RSSचं समर्थन केलं''; मोहन भागवतांनी सांगितला ९० वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा

FDA Action: कच्च्या मालावर एफडीएची कारवाई! खवा, मावा, काजू, बदामसह १७.८२ टन साठा जप्त

SCROLL FOR NEXT