पुणे

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात ४२ हजार ६११ जलतारा कामे

CD

जिल्ह्यात ६१ हजार
जलसंधारण कामांचे नियोजन

सर्वाधिक ४२ हजार ‘जलतारा’ कामे: ग्रामीण मजुरांना रोजगार

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत जलसंधारणाची ६१ हजार २१५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांमुळे जलसंधारणाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

यंदा पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील १५पैकी १३ तालुक्यांत अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, रब्बी हंगामाचे क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध १२ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र, दीर्घकालीन उपाय म्हणून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

योजनेंतर्गत गावोगावी जलतारा प्रकल्प राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर माती बंधारा, सिमेंट बंधारा, दगडी बांध, शेततळे, शोष खड्डे, जलतारा, विहीर पुनर्भरण, माती नालाबांध, गाळ काढणे, रेन वॉटर हारवेस्ट, तलाव पुनररजीवण, भात खाचर, भूमिगत बंधारा, नदी पुननर्जीवण, गॅबियन बंधारा, सीसीटी,मजगी, बंधारा दुरुस्ती, वन तळे अशी कामे केली जाणार आहेत. लोकसहभागातून ही कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

----चौकट-----
आदिवासी भागात वनराई बंधारे
पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे जलतारा प्रकल्प राबविताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे या भागांत वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. पेठ तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत १६३ वनराई बंधारे पूर्ण केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सुमारे सहा कोटी सात लाख दोन हजार लिटर पाणीसाठा क्षमतेत वाढ झाली आहे.
-------
तालुकानिहाय प्रस्तावित जलसंधारणाची कामे:
तालुका...कामांची संख्या
बागलाण...४,५५०
चांदवड...९८५
देवळा...२,०३०
दिंडोरी...४,३२२
इगतपुरी...१,४४४
कळवण...३,३७२
मालेगाव...२१,४२०
नांदगाव...३,४०६
नाशिक...५२५
निफाड...१,७६४
पेठ...३,१६०
सिन्नर...३,७७९
सुरगाणा१,४५९
त्र्यंबकेश्वर...४,९१४
येवला...४,०८५
एकूण...६१,२१५
------
सामाजिक संस्था, कंपन्यांना सहभागाचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लोकसहभागातून गावांमध्ये विविध कामे हाती घेतली जात आहेत. सामाजिक संस्था, संघटना आणि कंपन्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या कामांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : "तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही"; वकिलाचे CJI सूर्यकांत यांना भर कोर्टात खडे बोल, आता होणार फौजदारी कारवाई?

एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरात वाढणार ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT