Pune Sakal
पुणे

मोरेबाग, सावंत विहारमध्ये पाणीसंकट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

आठवडाभरापासून पाणी नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज प्रभाग क्रमांक (४०) मधील सावंत गार्डन, मोरेबाग, सावंत विहारसह एकूण १० ते १५ सोसायट्या आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी आलेले नाही. तसेच मागील काही दिवासांपासून पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येणे तसेच अवेळी येणे, अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणांवर वाढल्या आहेत. अनेकदा टँकरही मागवावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

महापालिकेकडे तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे तक्रार करुनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशी संतापले आहेत.पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनाही ही परिस्थिती सोसायट्यांच्या सदस्यांकडून वारंवार दाखविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनीही ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार केल्यानंतर दोन दिवस पाणीपुरवठा सुरळित होतो. मात्र, दोन दिवसानंतर परिस्थिती पुन्हा जशास तशी होते. सध्याच्या वेळी तर तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होत आहे. सातत्याने टँकरची वाट पाहणे, पाणी वेळेवर न येणे या गोष्टीमुळे वेळेचे व्यवस्थापन बिघडत असून नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि नाकर्तेपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. आम्ही याचा खूप त्रास सहन करत आहोत. टँकरने पाणी मागवावे लागते. पाणीपुरवठा कर्मचारी लक्ष देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे ते मुद्दाम असे करत आहेत काय असा प्रश्न पडतो

- अॅड. दिलीप जगताप, स्थानिक नागरिक.

या भागात अडचण असून त्याबाबतची तक्रार मिळाली आहे. कर्मचाऱ्यांकडून पाहणी चालू आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या लवकरच सुटेल.

- प्रशांत कुंभार, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

Cameron Green: कॅमेरॉन ग्रीनच्या KKR साठी का गोलंदाजी केली नाही? अजिंक्य रहाणेच्या टोल्यानंतर थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिलं स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रॅण्ड 'प्राजक्तराज' बद्दल घेतला मोठा निर्णय; कारण सांगत म्हणाली, 'मला खूप अडथळे...'

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

SCROLL FOR NEXT