PNE26W41353 - सोलापूर ः सायकलला सहा घागरी बांधून पाण्यासाठी भटकंती करणारे लोंढे दांपत्य.
PNE26W41355 - मोटार लावूनही पाणी येत नसल्याने पाण्याची प्रतीक्षा करणारे नागरिक.
PNE26W41354 - पाणी येत नसल्याने नळच बुजवून टाकल्याचे दाखवताना नागनाथ बंडी.
वास्तव वेध -
प्रभाग क्रमांक ११
पावसाळ्यातही पिठ्ठा नगरात पाण्यासाठी नागरिकांचा पिट्टा!
३०० फुटांवरून घेतले कनेक्शन, तरी नळ कोरडेच; एकाच मुख्य लाइनवर ३०० मोटारी, पाच वर्षांपासून पाण्यासाठी वणवण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : सायकलला सहा घागरी, हातात हंडा आणि प्रत्येक थेंबासाठी दुसऱ्याच्या नळावर विनवणी... प्रभाग क्रमांक ११ मधील पिठ्ठा नगरातील हे दृश्य पाणीटंचाईचे नव्हे, तर मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना किती टोकाचा संघर्ष करावा लागतोय, याचे विदारक वास्तव सांगणारे आहे. तब्बल ३०० फुटावरून कनेक्शन आणूनही नळाला पुरेसे पाणी येत नाही. एकाच मुख्य लाइनवर सुमारे ३०० मोटारी असल्याने पाणीपुरवठ्याच्या वेळी नागरिकांची धावपळ सुरू होते. पाच वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
-------------------------
महापालिका अधिकारी समजून घेराव
‘दैनिक सकाळ’चे प्रतिनिधी भागात पोचले असता, संतप्त नागरिकांनी त्यांना महापालिकेचे अधिकारी समजून घेराव घातला. पत्रकार असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी प्रत्यक्ष समस्या दाखवून दिल्या. पाणी येत नसल्याने काही रहिवाशांनी नळच बुजवून टाकल्याचेही समोर आले.
------------------------
पावसाळ्यातील विदारक चित्र
प्लॉट क्रमांक दोनमधील महादेवी व किरण लोंढे दांपत्य सायकलला सहा घागरी बांधून, हातात हंडा घेऊन ज्यांच्या नळाला बारीक धार येते, त्यांच्या दारात पाण्यासाठी विनवणी करताना दिसले. मोटार लावूनही पाणी येत नसल्याने काही नागरिक मोटारीत पाणी ओतून ती पाणी खेचेल, या आशेवर बसतात.
------------------------
कोट
PNE26W41356
पाण्याची वेळ म्हणजे धावपळीची वेळ. कधी सुरुवातीची काही मिनिटे, तर कधी शेवटची १५ मिनिटेच पाणी मिळते. उरलेला दिवस पुढच्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत जातो. पिण्याचे पाणी मिळाले तर मिळाले, नाहीतर नाहीच. मोटारीमध्ये पाणी ओतत बसावे लागते. आम्ही मेलो तरी राजकारणी व अधिकारी फिरकणार नाहीत.
- मीरा देठे, रहिवासी
-------------------------
कोट PNE26W41357
याच स्थितीत आम्ही पाच वर्षांपासून दिवस काढतोय. पिठ्ठा नगरात पाणी नाही, तर इतर ठिकाणी पाण्याचे पाट रस्त्यावर वाहतात. कोणालाही आमची चिंता नाही. गरज असली गोड बोलणारे लोकप्रतिनिधी इकडे फिरकत नाहीत. पाणीपट्टी मात्र वर्षाची घेतात, लाजत नाहीत.
- अश्विनी कामूर्ती, रहिवासी
----------------------------
नळ बुजवला; कारण पाणीच नाही!
पाणी येत नसल्याने पिठ्ठा नगरातील नागनाथ बंडी यांनी नळच बुजवल्याचे सांगितले. यातून पाणीपुरवठा व्यवस्थेवरील नागरिकांचा उडालेला विश्वास यातून दिसतो. जवळपास ५०० हून अधिक घरे आजही तहानलेली व संतापलेली आहेत.
------------------------------
सवाल प्रशासनाला
३०० फुटाचे कनेक्शन, ३०० मोटारी आणि तरीही नळ कोरडेच असतील, तर पाणीपुरवठ्याचे नियोजन नेमके कुठे चुकते आहे? पाच वर्षांची ही समस्या कधी सुटणार? सामन्यांच्या व्यथा काय फक्त निवडणुकीपुरत्याच सोडवण्याचे आश्वासन देऊन इतरवेळी मरणयातना भोगण्यास सोडणार का?
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.