पुणे

पुरंदरमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र

CD

जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
​सासवड, ता. १४ : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. सध्या तालुक्यातील सात गावांची तहान शासकीय टँकरवर अवलंबून आहे. आणखी काही गावांमधून टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.

​तालुक्यातील पूर, पोखर, पिसे, भिवरी, साकुर्डे, बहिरवाडी, वागदरवाडी आणि भिवडी या सात गावांमध्ये सध्या स्वतंत्र सात शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये साकुर्डे आणि पूर-पोखर या भागांत टंचाईची तीव्रता जास्त असल्याने तिथे दररोज टँकरच्या तीन खेपा सुरू आहेत, तर उर्वरित गावांमध्ये दररोज एक खेप दिली जात आहे.


प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
राख आणि राजुरी या गावांसाठीचे प्रस्ताव सध्या प्रांत कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ​वाल्हा आणि शिवरी या गावांसाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर झाले आहेत. याव्यतिरिक्त ​दौंडज या गावातूनही लवकरच टँकरची मागणी येण्याची शक्यता आहे. ​टँकर मंजुरीसाठी प्रथम ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे, तिथून तहसील आणि शेवटी प्रांत कार्यालयाकडे प्रस्ताव जातो. प्रांतांच्या आदेशानंतरच संबंधित गावात टँकर सुरू होतो. तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा सध्या पाझर तलावांतील साठ्यावर अवलंबून आहे.


पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अविनाश जगताप यांच्या माहितीनुसार
- पिलाणवाडी तलावात ७.६२ दशलक्ष घनफूट साठा असून त्यातून शिवरी प्रादेशिक योजना सुरू
- गराडे तलावात केवळ मृतसाठा असला तरी विहिरीद्वारे गराडे, बोपगाव, हिवरे, कोडीत व चांबळी या गावांच्या योजना सुरू
- घोरवडी तलावात ७.४५ दशलक्ष घनफूट साठा असून त्यावरून सुपे, पिंपळे, बोऱ्हाळवाडी व नवीन दिवे योजना सुरू
- माहूर तलावात १.६६ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असून माहूर, मांढर व धनकवडी परिसराला होतो पाणीपुरवठा

दृष्टिक्षेपात टँकर
सुरू असलेले...... ७
मागील वर्षीचे...... २१
प्रस्तावित ...... ४

पुरंदर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ६७ योजना मंजूर आहेत. त्यापैकी २९ कामे पूर्ण आहेत. उर्वरित कामे निधीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. ज्या गावांकडून टँकरची मागणी येत आहे, तिथे तातडीने आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे.
- रितेश मुंडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती पुरंदर

साकुर्डे गावच्या वाड्यावस्त्यांवर सध्या शासकीय टँकरने पाणी येते, पण गावठाण भागात मात्र आम्हाला खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रत्येक खेपेला दोन बॅरल पाणी भरून ठेवावे लागते. शासनाने गावठाण भागातही तातडीने टँकर सुरू करणे गरजेचे आहे.
- सिंधू सस्ते, ग्रामस्थ, साकुर्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT