पुणे

पाणी शिल्लक राहिले तरच रब्बी पिकांना द्या

CD

पाणी शिल्लक राहिले
तरच रब्बी पिकांना द्या

जलसंपदा विभागाचे आदेश; १६ पासून पिण्याच्या पाण्यातही कपात

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाल्यामुळे १६ सप्टेंबरपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० टक्के पाणी कपात करावी, असे आदेश जलसंपदा विभागाने सोमवारी दिले.
तसेच पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी, औद्योगिक वापर आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ व इतर संस्थांच्या चारा कार्यक्रमासाठी लागणारी गरज भागविल्यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास रब्बी हंगामातील पिकांसाठी प्राधान्याने मंजुरी द्यावी, असे आदेशही दिले आहेत.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, १६ ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेले पाणीच बागा, बांधकाम व धुलाईसाठी वापरावे, असेही आदेशात म्हटले आहे.
पिण्याचे पाणी, जनावरे आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचे सिंचनासाठी वाटप होईल. प्रथम रब्बी हंगामातील भुसार व चारा पिकांना, त्यानंतर इतर रब्बी पिकांना आणि पाणी शिल्लक राहिल्यासच बारमाही पिकांना मंजुरी दिली जाईल. पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर भर दिला जाईल. औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अनधिकृत पाणी
उपशावर होणार कारवाई
धरणे, नद्या व कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तत्काळ रोखण्यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालतील. दोषींवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाईल.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी सदस्य, तर धरणाशी संबंधित अधीक्षक अभियंता सदस्य सचिव असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT