water discharge from Khadakwasla dam stopped release of drinking water for Daund Indapur  sakal
पुणे

Khadakwasla Dam Water : खडकवासला धरणातून विसर्ग बंद; दौंड, इंदापूरसाठी पिण्याचे पाणी सोडण्यास सुरवात

मंगळवारी मुठा नदीत सायंकाळी सात वाजल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी पिण्याचे पाणी मुठा कालव्यातून सोडण्यास मंगळवारी रात्री प्रारंभ झाला. अतिरिक्त झालेले पाणी मुठा नदीत सोडले जात होते, मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी होत गेल्याने दुपारी एक वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.

मंगळवारी मुठा नदीत सायंकाळी सात वाजल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले होते. मंगळवारी रात्री अकरा ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत ३४२४ क्युसेकचा विसर्ग सुरू होता.

धरणात बुधवारी सकाळी सहा वाजता ९४.०८ टक्के पाणीसाठा होता. कालव्यातून १००५ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर कमी झाल्याने येवा (इनफ्लो) कमी होत गेला. धरणाची पातळी कमी होऊ लागल्याने बुधवारी सकाळी सात वाजता विसर्ग ३४२४ क्यूसेकवरून २५६८ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर ११ वाजता १७१२, ११.३० वाजता ८५६, बारा वाजता ४२८ क्यूसेकने विसर्ग कमी करण्यात आले.

विसर्ग बंद झाला तेव्हा कालव्यातून १००५ क्यूसेक विसर्ग सुरू होता. दरम्यान, पानशेत धरण संध्याकाळी पाच वाजता सुमारे ७२ टक्के भरले होते. वरसगाव धरणात ६५ टक्के पाणी जमा झाले आहे. परंतु बुधवार सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे एक, पानशेत येथे पाच, वरसगाव येथे पाच, टेमघर येथे २५, मुळशी येथे १९, भामाआसखेड दोन, पवना २५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

बुधवारी सायंकाळी पाच वाजताची धरणस्थिती

धरणाचे नाव -एकूण क्षमता -उपयुक्त साठा -टक्केवारी

खडकवासला- १.९७ -१.८६ -९४.०८

पानशेत -१०.६५ -७.६१- ७१.४९

वरसगाव -१२.८२ -८.२४- ६४.३१

टेमघर -३.७१ -१.७७ - ४७.७६

चार धरणातील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा १९.४८ टीएमसी / ६६.८५ टक्के

मुळशी - २०.१६ - १२.०५ - ५९.७७

भामा आसखेड - ७.६७ - ४.६६ -६०.७६

पवना - ८.५१ - ५.७५- ६७.५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT