Chaskaman Dam Sakal
पुणे

चास कमान धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणात शंभर टक्के पाणीसाठा

चास कमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली.

राजेंद्र लोथे

चास कमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली.

चास कमान धरण (ता. खेड) - पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून शुक्रवार ता. १६ रोजी धरणाच्या एकूण पाच दरवाजातून १२६५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भिमा नदित सोडण्यास येत असून धरणात शंभर टक्के (८.५३ टीएमसी.) पाणीसाठा असल्याने गरज भासल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे सहाय्यक उप अभियंता डी. एस. डिग्गीकर, शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकर च्या खोऱ्यात म्हणजेच चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. गेली दोन दिवसांपासून अधुनमधून पडणाऱ्या पावसाने धरणातून मर्यादित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र गुरूवारी रात्री ता. १५ पासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणात येणारी पाण्याची आवक वाढली.

धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने अतीरिक्त ठरणाऱ्या पाण्याचा विसर्ग तातडीने करण्यात येत आहे. संततधार पाऊस शुक्रवारीही सुरूच राहिल्याने शुक्रवारी २७७० क्युसेक्स ने सर्वप्रथम विसर्ग करण्यात आला, मात्र पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच राहिल्याने सकाळी ६.३० वाजता विसर्ग ४६१० पर्यत वाढविण्यात आला, आवक चालूच राहिल्याने सकाळी ८.३० वाजता ५५१० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला, पाण्याची आवक वेगाने होत असल्याने दुपारी बारा वाजता पुन्हा विसर्ग वाढवून ९३७५ क्युसेक्स करण्यात आला.

सद्य स्थीतीत धरणाच्या पाच दरवाजाव्दारे १२६५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भिमा नदिपात्रात करण्यात येत आहे. धरणाचे सहाय्यक उप अभियंता डी. एस. डिग्गीकर, शाखा अभियंता उत्तम राऊत यांच्यासह जलसंपदा विभागाचे भिवसेन गुंडाळ, ज्ञानेश्र्वर कदम, बाळासाहेब आनंदकर, ज्ञानेश्र्वर हुले, बाबाजी कडलग, संभाजी बोंबले, उद्धव नाईकडे, बाळासाहेब गुंडाळ यांसह अन्य कर्मचारी हे धरणस्थळावर चोवीस तास थांबून पाण्याच्या पातळीचा आढावा घेत आहेत. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच असल्याने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा ईशारा जलसंपदा विभागाचे वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon Sports Complex : जळगाव जिल्हा क्रीडासंकुलाला ऑलिंपिक टच! खानदेशातला पहिला अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक साकारणार

D Mart Barcode Scam : डी मार्टच्या बारकोडमध्ये स्कॅम करायचा, कंपनीतील कर्मचाऱ्याने लावलं होतं कामाला...; पण एक चूक पडली महागात

Video: ट्रॅक्टरवर वाजलं 'चुनरी-चुनरी' गाणं.. फॉरेनरसुद्धा थिरकल्या; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Marathi Breaking News : पंढरपूरमध्ये तीन दुकानांना मोठी आग

SCROLL FOR NEXT