water leakage in tilekar nagar during water shortage kondhwa yewalewadi pune Sakal
पुणे

Water Crisis : पाणीटंचाई असताना टिळेकरनगरमध्ये पाणीगळती

नागरिकांतून नाराजी; उपाययोजना करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : कोंढवा-येवलेवाडी परिसरात पाणीटंचाई असताना टिळेकरनगरमधील अवैध नळजोडणीमुळे पाण्याची गळती होत आहे. या पाणीगळतीमुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा सुरळित होत नसताना मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर पाणीगळती होत आहे.

परिसरात पाणीसंकट निर्माण झाले असून नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. अशातच कोणत्याही ठिकाणी होत असलेली पाणीगळती थांबविल्यास आपोआप पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी होत असलेल्या पाणीगळतीबाबत नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणांवर नाराजी असून अशा प्रकारची गळती थांबवायला हवी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

खूपवेळा महापालिकेच्या व्हाट्सअप क्रमांकावर आणि ऑनलाईन तक्रार करुनही काहीही कारवाई होताना दिसत नाही. प्रशाससनाकडून अशावेळी दखल घेवून दंड करत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र वाघ यांनी केली आहे.

संबधित ठिकाणांची पाहणी केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येतील. तसेच कारवाई करुन त्वरित ही पाणीगळती थांबिवण्यात येईल.

- नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

महापालिकेच्या ॲपवर तक्रार दाखल केली आहे पण, टोकन क्रमांकच मिळाला नाही. ही अवैध नळजोडणी सुरूच आहे असून आम्हाला आशा असते की, अशा नळजोडणीवर काही दखल घेवून दंड करण्यात यावा. सर्रास चाललेली अवैध नळजोडणी थांबावी व ह्याला कुठेतरी लगाम लागावा आणि सर्वसामान्य लोकांना समान पाणी मिळावे ही आमची अपेक्षा आहे.

- अभिजीत शाह, अध्यक्ष, थ्री ज्वेल्स सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT