Raj-Thackeray.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019  : राज ठाकरेंच्या सभेत आता हे विघ्न

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे :  लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे न करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत. आज सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्या मैदानावर पाणी साचले असून चिखल झाला आहे. त्यामुळे या मैदानावर आज राज ठाकरे यांची सभा कशी होणार याची चिंता सर्वांना लागली आहे.

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी-शहा यांच्यावर तुटून पडलेल्या राज यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज ठाकरे विधानसभेसाठी कोणता मुद्दा उपस्थित करणार याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ शहरात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने आज होणार आहे. पण या सभेत सतत काही ना काही विघ्न येत आहेत. सुरवतीला त्यांना पुण्यात सभेसाठी मैदान मिळत नव्हते. आता, मैदान मिळाले परंतू पावसामुळे ते चिखलमय झाले आहे. 

मनसेचे कार्यकर्ते मैदानात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज काहीही झाले तरी राज ठाकरे यांची सभा होणारच असे त्यांनी ठरविलेच आहे. त्यामुळे पुण्यात राज ठाकरे यांची सभा निर्विघ्न पार पडते का याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT