पुणे

कोल्हापूर:धरणातील पाण्याचे नियोजन केले का? जिल्हा इरिगेशन फेडरेशनकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब

CD

धरणातील पाण्याचे नियोजन केले का?

जिल्हा इरिगेशन फेडरेशनकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : यंदा बारमाही पिके घेणे टाळून ऊस लागवड केल्यास त्याला पाणी पुरविण्याची काळजीपूर्वक जबाबदारी घ्यावी, असे परिपत्रक जलसंपदा विभागाने काढले आहे. मात्र, हे परिपत्रक काढण्यापूर्वी जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे नियोजन केले आहे का, असा सवाल कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
फेडरेशनने जिल्ह्यातील विक्रांत पाटील-किणीकर व माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेऊन चर्चा केली. बारमाही पीक घेऊ नये, असे परिपत्रक काढताना पाणी दिले जाणार नाही, असे परिपत्रक कशाच्या आधारावर काढले, अशी विचारणा पाटील-किणीकर यांनी केली.
यावर कार्यकारी अभियंता देवकर यांनी शासन निर्णयानुसार हे परिपत्रक काढल्याचे सांगितले. त्यानुसार नियोजन केले असून क्रमांकानुसार जिल्ह्यातील धरणांनी सूक्ष्म नियोजन करून बफर स्टॉक ऑगस्ट २०२७ अखेर पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त पाणी शिल्लक ठेवून सिंचनासाठी पाणी वापर करावा, असे स्पष्ट केले आहे. बऱ्याचदा बराच काळ पाऊस न पडता फुटी पाण्याची पातळी स्थिर न ठेवल्यामुळे साठवण, भात, भुईमूग अशा पिके वाळून जातात. अशा परिस्थितीत धरणांमधील साठवलेले पाणी नद्यांमधून वाहून जात असताना त्याचा वापर पिकांना होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. धरणातील सर्व पाण्याचे पुन्हा सूक्ष्म नियोजन करून इरिगेशन फेडरेशनला पुढील वर्षाच्या सिंचन धारणेबाबत कळविणे गरजेचे आहे, असे आवाहन देवकर यांनी केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, एस. ए. कुलकर्णी, सुभाष शहापुरे, चंद्रकांत पाटील, सखाराम ग्राम पाटील, सचिन जमदाडे, जगनाथ पाटील, निवास पाटील आदी उपस्थित होते.

IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

Maharashtra Live News : जखमी तरुणासोबत राहुल गांधींची पत्रकार परिषद; "तरुणांच्या आवाजापुढे कोणीही टिकणार नाही"

Kolhapur Water Crisis : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य! धरणांमधील 10 टक्के पाणी राखून ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे महत्त्वाचे आदेश

WhatsApp चे नवीन धमाकेदार फीचर! आता 10 मिनिटांपासून 14 दिवसांपर्यंत आधीच शेड्यूल करा मेसेज, फोटो अन् व्हिडिओ...

SCROLL FOR NEXT