water municipality without any condition Demand from Sharad Pawar  
पुणे

जीवन प्राधिकरणाची पाणी योजना विना अट पालिकेला द्या; शरद पवार यांच्याकडे मागणी

१८ कोटी रुपये रद्द करण्याची, शरद पवार यांच्याकडे मागणी

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : शिवणे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे, कोपरे ही गावे महापालिकेत आली आहे. या गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आहे. ही योजना पालिकेला हस्तांतरित करण्यासाठी योजनेला झालेला १८कोटी रुपयांचा खर्च द्यावा. असे प्राधिकरणाने पालिकेला सांगितले आहे. दरम्यान, प्राधिकरणाने मागितलेली पूर्ण रक्कम रद्द करून योजना थेट पालिकेला द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे माजी उपमहापौर, नगरसेवक दिलीप बराटे यांनी केली आहे.

महापालिकेने वारजेची स्वतंत्र पाणी योजना २००५मध्ये केली. त्यामुळे, वारजे येथील पूर्वीची जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना शिवणे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे, कोपरे या गावांना दहा वर्षापूर्वी हस्तांतरीत केली होती. ही चार गावे समाविष्ठ झाल्याने गावांची जीवन प्राधिकरणाची पाणी योजना हस्तांतरीत झाली पाहिजे. पाणी योजना करताना शासनाच्या नियमाप्रमाणे त्यावेळी १५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीने भरली आहे. तरी देखील योजना हस्तांतरीत करण्यासाठी प्राधिकरणाने १८कोटीची मागणी केली आहे. असे बराटे यांनी पवारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीणचे खडकवासला मतदार संघ अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे उपस्थित होते.

ही रक्कम अवास्तव असल्याने महापालिकेने ही रक्कम दिलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशी दोन्ही यंत्रणेच्या निर्णयात अडकलेले आहे. गावे पालिकेत आल्याने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. रक्कम न दिल्याने योजना पालिकेच्या ताब्यात आली नाही. या चार गावातील लोकसंख्या मागील १० वर्षात दुप्पट झाली आहे. काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच, प्राधिकरणाच्या पाण्याचा दर पालिकेपेक्षा जास्त आहे. त्याची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या चार गावांची पाणी योजना कोणतीही रक्कम न देता पालिकेला द्यावी. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी भेटून माहिती दिली आहे.

वारजे १९९७ साली पालिकेत आले. त्यावेळी, वारजेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना पालिकेला देताना कोणतीही रक्कम पालिकेने प्राधिकरणाला दिली नव्हती.

-दिलीप बराटे, माजी उपमहपौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT