water pipe burst in Patas Chowk lakhs of liters of water was wasted daund pune  Sakal
पुणे

Daund News : पाटस चौकात जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे भर चौकात फुटल्याचा प्रकार घडला.

अमर परदेशी

पाटस : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे भर चौकात फुटल्याचा प्रकार घडला. जलवाहिनीतुन प्रचंड पाणी वाहू लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली.एका बाजूला पाण्याची भीषण टंचाईची परिस्थिती असताना जलवाहिनीतुन लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी वरवंड येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव पूर्णतः कोरडा पडला होता.त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला.तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्याचा पाणी पुरवठा बंद होता. तलावात पाणी सोडण्यासाठी वरवंड ग्रामपंचायतीच्या वतीने देखील जलसंपदा विभागाला मागणी केली होती.अखेर नियोजीत वेळेत तलावात पाणी सोडण्यात आले.

सध्या तलावात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाला.त्यामुळे संबधीत गावांच्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या.तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला जलवाहिनीने पाणी सुरू करण्यात आले.

मात्र, पाटस येथे रविवारी (ता.१२) सायंकाळी साडेसात वाजता जलवाहिनी अचानक फुटली.भर चौकात दुकानाच्या बाजूलाच जलवाहिनी फुटल्याने प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू झाला.नागरिकांची अक्षरशः धांदल उडाली.

काही वेळातच लाखो लिटर पाणी रस्त्याने वाहत होते.तालुक्यात एक बाजूला पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे पाण्याची नासाडी पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या पूर्वीही अनेकदा जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला आहे.मात्र संबधीत विभाग संवेदनशील दिसत नसल्याची भावना काहींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT