पुणे

पवनेतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात

दीपेश सुराणा

पिंपरी - पवना नदीपात्रात शहरातील काही झोपडपट्ट्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्याद्वारे मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी तसेच बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीही मिसळते. त्यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शहरातून २४.५ किलोमीटर अंतरात पवना नदी वाहते. ती किवळे, रावेत येथून शहरात प्रवेश करते व चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी मार्गे सांगवी, दापोडी-हॅरिस पुलाजवळ मुळा नदीला मिळते. पिंपरीत थेट नाल्याचे पाणी मिसळत असल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला प्रत्यक्ष पाहणीत आढळले. तसेच थेरगाव पूल येथे गटाराचे सांडपाणी तसेच नाल्यांमधून विशेषतः झोपडपट्ट्यांतून सांडपाणी नदीत मिसळते. 

शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघुउद्योगांतून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. एमआयडीसी, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दिला आहे.सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात नऊ ठिकाणी १३ मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. चऱ्होली येथे रोज २० दशलक्ष लिटर क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. चिखली (१२ दशलक्ष लिटर), पिंपळेनिलख (१५ दशलक्ष लिटर), बोपखेल (५ दशलक्ष लिटर) येथील मैलाशुद्धीकरण केंद्राच्या कामांसाठी निविदा कार्यवाही सुरू आहे.

पवना नदीत प्रक्रिया न करता मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत महापालिकेतर्फे कार्यवाही व्हावी. रसायनमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांना महापालिका पर्यावरण विभागाने नोटिसा बजावणे आवश्‍यक आहे. 
- विकास पाटील,  अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती

 शहरात होणारा पाणीपुरवठा (महापालिका व एमआयडीसी) : ४६९.३१ दशलक्ष लिटर (प्रतिदिन)
 पाण्याची गळती (२५ टक्के) : रोज ११७.३३ दशलक्ष लिटर 
 निर्माण होणारे घरगुती सांडपाणी : रोज सरासरी २९० दशलक्ष लिटर 
 शहरात टाकलेल्या मलनिस्सारण नलिकांची लांबी : १४७२ किलोमीटर 
 सध्या प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी : रोज २६५ दशलक्ष लिटर 

शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये थेट मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण 
कमी व्हावे, यासाठी पालिकेतर्फे  चार ठिकाणी मैलाशुद्धीकरण  केंद्रांची कामे हाती घेतले आहे. ताथवडे गावासाठी १० दशलक्ष  लिटर क्षमतेचे मैलाशुद्धीकरण  केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली  आहे. संबंधित जागेचा ताबा  बाकी आहे.
- संजय कुलकर्णी,  कार्यकारी अभियंता, पर्यावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Verdict : विवाहित महिला 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' केल्याचा आरोप करु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील सेवा तब्बल तीन महिने विस्कळीत राहणार; का आणि कोणत्या?

T20 World Cup 2026 : विश्वकप स्पर्धेच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 'तो' लकी खेळाडू स्पर्धेतून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर ठरला; उदय धातूंडे यांची निवड

Maharashtra Education Policy : राज्यात शिक्षक संचमान्यतेचे नवे निकष लागू; भविष्यातील शिक्षक भरतीवर टांगती तलवार, हजारो शिक्षकांची पदे होणार कमी!

SCROLL FOR NEXT