फुगेवाडी - नाल्यातील सांडपाणी थेट पवना नदीपात्रात मिसळत आहे.
फुगेवाडी - नाल्यातील सांडपाणी थेट पवना नदीपात्रात मिसळत आहे. 
पुणे

पिंपरी चिंचवड शहरातील ४७ एमएलडी पाणी प्रक्रियेविना थेट नदीत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे शक्‍य असलेले प्रकल्प असतानाही क्षमतेपेक्षाही कमी प्रमाणात प्रक्रिया होत असल्याने ४७ एमएलडी पाणी थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांत सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांची प्रदूषण पातळी वाढल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवड परिसरात दररोज ३१२ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी केवळ २६५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. महापालिकेच्या १४ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता ३५३ एमएलडी असूनही ४७ एमएलडी पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाते. पवना नदीमध्ये सहा, तर इंद्रायणीमध्ये तीन नाल्यांचे पाणी नदीत मिसळते. परिणामी, या नद्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेकडून नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी हे प्रक्रिया करूनच सोडणे अपेक्षित आहे. मात्र, संपूर्ण सांडपाण्यावर पाण्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.

हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विजेवर चालतात. वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नाही. त्यामुळे बऱ्याचदा अर्धवट प्रक्रिया झालेले पाणी नदीमध्ये सोडले जात असल्याचा निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला आहे. 

महापालिकेने ताथवडे, चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथे नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पांची क्षमता ४२ एमएलडी आहे. मात्र, त्याला अद्याप गती मिळालेली नाही. पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरातही सांडपाण्याची सुविधा नाही. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी सेफ्टीटॅंक वापरण्यात येतात. यात तयार होणारे पाणी थेट नाल्यामध्ये सोडले जाते. त्यामुळे येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. तळवडे आयटी पार्क परिसरात दररोज  ६३० घनमीटर सांडपाणी तयार होते. मात्र, याठिकाणी अनेक भागांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरले जात आहे.

प्रस्तावित प्रकल्प (क्षमता एमएलडीत)
ताथवडे    १० 
चिखली    १२ 
बोपखेल    ५ 
पिंपळे निलख    १५ 
एकूण    ४२

पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाबाबत सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल तयार झाला आहे. नाल्यांमधून नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. 
- किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT