pune.jpg 
पुणे

आरटीओत डेंगीचा धोका; कार्यालयाच्या आवारात साचले पाणी

सचिन बडे

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. यात डासांची पैदास होऊन कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारामध्ये कारवाई करून पकडण्यात आलेली लहान-मोठी सुमारे 800 ते 900 वाहने आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या वाहनांच्या छतांसह खोलगट भागात पाणी साचले आहे. तसेच, मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्येदेखील सर्वत्र पाणी साचले आहे. या ठिकाणी नागरिकांना दुचाक्‍या उभ्या कराव्या लागत आहेत. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी, विविध कामानिमित्त आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

कार्यालयाच्या आवारामध्ये दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांचा कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, कार्यालय आणि परिसराची देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छतेचे काम महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. यासंदर्भात आरटीओने संबंधित विभागांना कळविले असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

''गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे कार्यालयाच्या आवारामध्ये पाणी साचलेले आहे. यासंदर्भात महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला कल्पना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच परिसर स्वच्छ करण्यात येईल.''
- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT