Pune News
Pune News esakal
पुणे

Pune News : मांजरीत पाणीप्रश्न गंभीर, नागरिकांमध्ये पालिकेविरोधात असंतोष

कृष्णकांत कोबल

मांजरी : यावर्षी लवकरच कुपनलिकांनी तळ गाठल्याने मांजरीकरांना सध्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, मुंढवा रस्ता, मांजरी फार्म या भागात गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. पुढील पाच महिने कसे जातील या चिंतेने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे मांजरी बुद्रुकमधून पालिकेविरोधात असंतोष वाढू लागला आहे.

मोठ्या प्रमाणात वाढत असलेले नागरिकरण, कुपनलिकांची वाढती संख्या, कमी होत असलेले बागायतिक क्षेत्र या सर्वांचा परिणाम येथील भूगर्भातील पाणीसाठ्यावर झालेला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बाराही महिने उपलब्ध होणारे पाणी आता सहा महिन्यांवर आले आहे. हिवाळा संपताच फेब्रुवारी-मार्च महिन्यातच कुपनलिकांनी तळ गाठला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठीही टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तेही वेळेवर येत नसल्याने रात्री अपरात्री महिला पुरुषांना पाण्यासाठी दूरवर फिरावे लागत आहे.

खासगी टँकरची चलती :

पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना स्वतंत्रपणे खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी पाचशे-सहाशे रूपयांना मिळणाऱ्या टँकरसाठी सध्या हजार ते बाराशे रूपये मोजावे लागत आहेत. मागणी वाढल्याने टँकर सांगितल्यानंतर तो दोन-तीन दिवसांनी येतो. पाण्यासाठी हजारो रूपये द्यावे लागत असल्याने गरीब कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गावठाण हद्दीत पालिकेकडून टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी पळावे लागत आहे.

ग्रामस्थांची नाराजी :

गाव पालिकेत समाविष्ट होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही पालिकेला गावच्या पाण्याचे नियोजन करता आले नाही. यापूर्वी ग्रामंचायतकडून राबविली जाणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. काही ठरावीक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचवेळी गावातील अनेक वस्त्या पाण्यासाठी वनवन फिरत आहेत. मिळकतकर आकारणी केली जात असताना पाण्यासारखी मूलभूत सुविधासुध्दा पालिका पुरवू शकत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावठाणात पाणी देण्याचे अश्वासन :

दरम्यान, गावठानातील नागरिकांनी राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी ७२ घरकुल या ठिकाणी दररोज दोन टँकर पाणीपुरवठा सुरू करण्याचे अश्वासन दिले. यावेळी सारिका प्रतापे, सुनीता ढेकणे, छकुबाई अंकुशराव, मंगल तेलंगे, रंजना रोकडे, सखुबाई दहिफळे, पिंकी दिवार, नंदा भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

मांजरी फार्म येथील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा :

येथील सादबा बाग, झांबरे - बहिरट वस्ती, त्रिमूर्ती नगर, मोरे काॅलनी, यश संकुल, तुपे पार्क मधील नागरीकांनी पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना निवेदन देऊन पाणी पुरवठ्याची मागणी केली. प्रा. अरूण झांबरे, रविंद्र बहिरट, दिलीप बहिरट, उमेश झांबरे, सुधाकर बहिरट, गणेश जाधव, सतिश पाटोळे, सविता झांबरे, उषा झेंडे, कमल बहिरट, नंदाबाई झांबरे, सुवर्णा फुलसुंदर, अर्चना खेडेकर आदी उपस्थित होते. दहा ते पंधरा दिवसांत पाणी पुरवठा न झाल्यास त्यांनी हंडा मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

"समाविष्ट गावांतून पाण्याच्या समस्येच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबतची माहिती मुख्य कार्यालय व लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविली आहे. पाणी प्रश्नाची परिस्थिती मांडली आहे. त्यावर निर्णय घेतला जाईल.'

- बाळासाहेब ढवळे पाटील सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT