पुणे

टंचाईग्रस्त गावांत तपासणार पाण्याची गुणवत्ता

CD

पुणे, ता. १३ : पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या ठिकाणापासून ते गावात नागरिकांना पाणी वितरित करण्याच्या ठिकाणापर्यंत नमुने तपासले जाणार आहेत. तसेच, पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचीही तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील पाच गावे आणि ५३ वाड्यांमधील एकूण १८ हजार ६५० नागरिकांना आठ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याची गुणवत्ता टिकविणेही महत्त्वाचे ठरणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नमुने तपासण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.

भरण्याच्या ठिकाणापासूनच तपासणी
टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर गावात टँकरमधून पाणी वितरित केले जाते, त्या ठिकाणीही नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेतील दोन्ही टप्प्यांवर पाण्याच्या गुणवत्तेची पडताळणी करता येणार आहे. स्रोत म्हणून वापरल्या जाणाऱ्या अधिग्रहित विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचे नमुनेही तपासले जाणार आहेत.


दृष्टीक्षेपात
- टँकरद्वारे पाच गावे आणि ५३ वाड्यांना पाणीपुरवठा
- सध्या सुरू असलेले आठही टँकर हे खासगी
- टँकरमध्ये पाणी भरताना आणि वितरणाच्या ठिकाणी तपासणी होणार
- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून नियोजन केले जाणार


पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी टँकरमध्ये पाणी भरतानाच तसेच गावांमध्ये पाणी वितरण करताना नमुने तपासले जाणार आहेत. याशिवाय अधिग्रहित विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचीही तपासणी केली जाईल. यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, ही तपासणी सातत्याने सुरू राहणार आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

SCROLL FOR NEXT