पुणे

टेंभू योजनेतून पाण्यासाठी निवेदन

CD

माणच्या पूर्वेकडील १६ गावांना ‘टेंभू’चे पाणी सोडा

अनिल देसाई; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

सातारा, ता. २० : माण तालुक्याच्या पूर्व भागांत अजूनही पाऊस नाही. वरकुटे मलवडी, विरळी यांसह पूर्व भागातील १६ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून टेंभू योजनेतून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली.
श्री. देसाई यांनी निवेदनात म्हटले, की माण तालुक्यात सध्या अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनानेही या भागातील गावांत पाणीटंचाई जाहीर केली आहे. त्यामुळे वरकुटे-मलवडी, महाबळेश्वरवाडी, विरळी, कळचौंडी, शेनवडी यासह १६ गावांना पिण्यासाठी टेंभू योजनेतून पाणी देणे आवश्यक आहे. महाबळेश्वरवाडी येथील तलाव वर्षातून दोन वेळा भरण्याचा शासनाचा अध्यादेश असून, सध्या टेंभू योजनेचे आवर्तन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरवाडी तलावासह परिसरातील सर्व बंधारे भरून घेण्यात यावेत, अशीही मागणीही त्यांनी केली. बंधारे व तलाव पाण्याने भरल्यास आगामी काळातील भीषण पाणीटंचाई, तसेच टँकरचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून प्रशासनाने आताच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. टेंभू योजनेतून तातडीने पाणी सोडून महाबळेश्वरवाडी व परिसरातील सर्व बंधारे भरून घ्यावेत,” अशी मागणी श्री. देसाई यांनी केली.
श्री. देसाई यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी टेंभू योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना पाणी सोडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे माण तालुक्याच्या पूर्व भागातील १६ गावांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


W43518
सातारा : संतोष पाटील यांना निवेदन देताना अनिल देसाई.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

Ratnagiri Coconut Prices : सणांच्या तोंडावर नारळाचा दर वाढला; दक्षिणेतील आवक घटल्याने तुटवडा, सुके खोबरे 250 रुपये किलो

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशींच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट, आदित्य ठाकरेंचा आरोप

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

SCROLL FOR NEXT