चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू sakal
पुणे

चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

चालू वर्षी ऑगस्ट महिन्याच्या चार तारखेला सर्वप्रथम धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

चास : चास- कमान धरणाच्या (ता. खेड) पाणलोट क्षेत्रातील भिमाशंकर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून १८५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे.

चालू वर्षी ऑगस्ट महिन्याच्या चार तारखेला सर्वप्रथम धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर ६ ऑगष्ट रोजी पाऊस थांबल्याने धरणाचे उघडण्यात आलेले दरवाजे बंद करून फक्त कालव्याव्दारे ५७० क्युसेक्स व कालव्यातून अतीवाहकाव्दारे नदीपात्रात २८० क्युसेक्सने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व प्रामुख्याने श्री क्षेत्र भिमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरूवात झाली आहे.

चास कमान धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने अतिरिक्त ठरणारे पाणी सोडणे गरजेचे असल्याने प्रथम शनिवारी सकाळी सात वाजता धरणाचे पाचही दरवाजे पाच सेंमी उघडून भीमा नदीपात्रात ९२५ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला, मात्र दुपारी धरणात पाण्याची आवक वाढल्याने दहा सेंमी ने दरवाजे उघडून १८५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे वतीने शाखा अभियंता महेंद्र गायकवाड तसेच सहाय्यक अभियंता प्रेमचंद शिंदे यांनी दिली.

नदीकाठी सतर्कतेचा इशारा

धरणातून सद्यः स्थितीत दरवाजाव्दारे १८५०, कालव्याव्दारे ५७० तर कालव्यातून अतीवाहकाव्दारे नदीपात्रात २८० असा एकूण २७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. भिमाशंकर खोऱ्यात पाऊस सुरूच असल्याने गरजेनुसार विसर्गात वाढ करावा लागणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT