jalsampada
jalsampada 
पुणे

चोवीस तासांमध्ये कालव्याची होणार दुरुस्ती : जलसंपदा विभाग

सकाळवृत्तसेवा

पुणे : उजवा मुठा कालव्याची सीमा भिंत ज्या ठिकाणी कोसळली तेथील दुरुस्ती येत्या 24 तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच शहराचा पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होईल. त्यासाठी जलसंपदा विभागाचेही प्रयत्न सुरू आहेत.

या बाबत जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, ""खडकवासला धरणातून शहरासह जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुणे शहराच्या लष्कर व पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 365 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू असतो. त्यामुळे त्याठिकाणी कोणतीही दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. जनता वसाहतीच्या लगतच्या कालव्याला 10 मीटरपेक्षा कमी रुंदीचा मातीचा भराव वाहून गेला आहे.

साधारण 5 मीटर उंचीचा मातीचा भराव पोकलेनच्या साहाय्याने केले जात आहे. येत्या 24 तासांमध्ये कालवा दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये खर्च जलसंपदा विभागाकडून केला जाणार आहे. आतापर्यंत साधारण 25 लक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे. सध्या दक्षतेसाठी खडकवासला धरणातील 2 ते 3 दरवाजे बंद ठेवण्यात आले आहे.''असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT