पुणे

काटकसरीने पाणी वापरा

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - निम्म्या शहराला अपुरा पाणीपुरवठा सुरू असतानाच पवना धरणातही यंदा कमी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. निश्‍चित केलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी शहराला पुरविले जात असल्यामुळे शहरवासीयांनी पाण्याची बचत करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

पुणे शहरात पाणीकपातीच्या मुद्यावरून संघर्ष पेटला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुलक्षणा धर, मयूर कलाटे यांनी त्याबाबत विचारलेले प्रश्‍न महापौर राहुल जाधव यांनी स्वीकारले नाहीत. तरीही संतप्त नगरसेवक सर्वसाधारण सभेत पाणीसमस्येला वाचा फोडण्याची शक्‍यता आहे.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरातील प्रतिव्यक्तीला रोज १३५ लिटर पाणी देण्यास सांगितले आहे. वहनव्यय धरून प्रतिव्यक्तीसाठी १५५ लिटर पाणी दिल्यास शहरातील सुमारे २२ लाख लोकांसाठी वर्षाला ४.४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पुरेसे ठरते. पिंपरी-चिंचवडसाठी ४.८४ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. सध्या शहराला ६.११ टीएमसी पाणी पुरविले जाते. त्यामुळे शहराला मंजूर कोट्यापेक्षा सव्वा टीएमसी जादा पाणी पुरविले जात असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

पवना धरणात १५ ऑक्‍टोबरला ७.९९ टीएमसी (९३.९ टक्के) उपलब्ध आहे. यंदा चार सप्टेंबरनंतर धरणात पाणीसाठा वाढला नसल्याने आहे त्या साठ्यातूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. सिंचन आणि बिगरसिंचन यासाठी रोज सरासरी २८.५० दशलक्ष घनफूट पाणी लागते. पुढील वर्षी १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन १५ ऑक्‍टोबरला केले जाते. सध्याचा साठा विचारात घेतला, तर सरासरी पाणीवापरानुसार ते पाणी २७ जूनपर्यंत पुरेल. त्यामुळे सर्वांनीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

शहरवासीयांना प्रतिव्यक्ती रोज दोनशे लिटरपेक्षा जास्त पाणी धरणातून दिले जाते. पुढील वर्षी एल निनो सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्‍यता आहे. यंदा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. आतापासूनच सिंचन व बिगर सिंचनाचे पाणी जपून वापरल्यास ते सर्वांना पुरेशा प्रमाणात देता येईल.
- नानासाहेब मठकरी, उपअभियंता, पवना धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT