पुणे

पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा

CD

टंचाईग्रस्त गावांना दिलासा

जिल्ह्यातील ५ गावांसह ५३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू; २९४ नवीन बोअरवेलना मान्यता

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ५ गावांना आणि ५३ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, सुमारे १८ हजार ६५० नागरिकांना याचा लाभ मिळत आहे.
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८१९ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या सुमारे ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील टंचाईच्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, आवश्यकतेनुसार नवीन टँकर मंजूर करण्यात येत आहेत.
खासगी अधिग्रहणाअंतर्गत विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध अहवालानुसार जिल्ह्यातील बहुतांश टँकरखेपा नियोजनाप्रमाणे पूर्ण करण्यात येत असून, पाणीपुरवठ्याची स्थिती समाधानकारक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी शासनाकडून ३३ नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्रोत बळकटीकरणासाठी १० कामे आणि विहीर खोल करणे व गाळ काढणे या २१ कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रादेशिक योजनांमध्ये मोरगाव, बेले आणि शिवरी या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी ६११ बोअरवेल दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी अंदाजे २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बंद पडलेल्या किंवा कमी क्षमतेने सुरू असलेल्या बोअरवेल पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे ग्रामीण नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

विविध कामांसाठी २४९ लाखांचा निधी मंजूर
जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन २९४ नवीन बोअरवेल योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांसाठी अंदाजे २४९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्व संबंधित विंधन विहिरींची खोदाई पूर्ण झाली आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करणार
जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत. तसेच ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पालघरमध्ये कलर कंपनीला भीषण आग; केमिकलच्या भडक्याने आगीचा लोट

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT