Water-Supply 
पुणे

पुणे : धरणांत पाणीसाठा असूनही पाणीटंचाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांना जाब विचारल्यानंतर शिवाजीनगरमधील पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र तरीही पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे. याचे कारण नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना कळू शकलेले नाही. संपूर्ण शहराला आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणांत असूनही शिवाजीनगरमधील रहिवाशांना आणखी किती दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार, असा प्रश्‍न आहे. 

संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर उपाय करीत आहोत. त्यामुळे सर्वत्र पुरेसे आणि वेळेत पाणी देण्यात येत आहे. मात्र ज्या काही भागांत वेळापत्रकानुसार पाणी मिळत नाहीत, तिथे सुधारणा करण्यात येतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी शनिवारी सांगितले. 

शिवाजीनगर भागातील विशेषत: प्रभात रस्ता, आपट रस्ता, डेक्कन, पोलिस वसाहत, गावठाणाच्या काही परिसरांत गेल्या सहा महिन्यांपासून अपुरे पाणी मिळत आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे. त्यावरून आंदोलन केलेल्या नागरिकांना काही दिवस टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. ते आता कमी झाल्याने पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

सेनापती बापट रस्त्यालगतच्या लोकवस्तीत जेमतेम अर्धा तासही पाणी येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या भागांमधील नागरिकांची तक्रार घेऊन भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेवक आदित्य माळवे यांनी तत्कलीन आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. तेव्हा पुढच्या दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. सहा महिन्यांपासून आम्हाला पाणी मिळत नाही, हे सतत सांगूनही अधिकारी मात्र उपाय सुचविण्यापलीकडे काही करीत नसल्याची माळवे यांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT