पुणे

पाणी टंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

CD

पाणी टंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये
३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

हिंगोली जिल्ह्यात ३ तालुक्यातील उपाययोजनांसाठी २८ लाख रुपये खर्चास मान्यता

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली : जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, सेनगाव या ३ तालुक्यांतील पाणी टंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांसाठी २८ लाख ९ हजार ८३६ रुपये निधी खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी वसमत, सेनगाव व हिंगोली तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. वसमत व सेनगाव तालुक्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट १६ गावांमध्ये २३ नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात वसमत तालुक्यातील आंबा, पळशी, वाखारी, पळसगाव, माळवटा, सारोळा, सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर, भंडारी, हत्ता तांडा, हत्ता, गोंडाळा, गोरेगाव, कहाकर बुद्रुक, आजेगाव, सवना, कडोळी व उटी ब्रम्हचारी या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस ७८ हजार ५१ रुपयेनुसार एकूण १७ लाख ९५ हजार १७३ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हिंगोली तालुक्यातील पारोळा, समगा, घोटादेवी, बोराळा, बोराळवाडी, दुर्गधामणी व भांडेगाव या ७ गावांमध्ये ७ नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांसाठी एकूण ५ लाख ४६ हजार ३५७ रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय हिंगोली तालुक्यातील खडकद बुद्रुक., खानापूर बंगला, खंडाळा, देऊळगाव रामा व गाडीबोरी या ५ गावांमध्ये ६ नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रक शासन मान्य दराप्रमाणे तयार करण्यात आले असून त्यासाठी ४ लाख ६८ हजार ३०६ रुपयांच्या खर्चासही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT