Water-Supply 
पुणे

मुंढव्यात पाण्यासाठी वणवण

सकाळवृत्तसेवा

मुंढवा - येथील नागरिक कमी दाबाने व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, केवळ पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्‍वासनच त्यांच्या पदरी पडत आहे. ऐनदिवाळीच्या तोंडावरही पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या भागात पूर्ण दाबाने पाणी सोडावे, असे निवेदन उत्तम लोणकर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

या भागात लष्कर पाणीपुरवठा विभागाने नवीन वाहिनी टाकून दोन वर्षे झाली. तिला व्हॉल्व्हही जोडले आहेत; परंतु ती वाहिनी वॉशआउट करून पाणी सोडण्यासाठी विभागाला दोन वर्षांपासून मुहूर्तच मिळाला नाही. दिवसेंदिवस येथील पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊन देखील पालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यानी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

गेल्या सात महिन्यांपासून झोडगेवाडा व भंडारीवाड्यात सुमारे ५० घरांना कमी दाबाने पाणी येते. सर्वांना सांगून झाले तरी आमच्याकडे लक्ष दिले जात नाही. दुरून पाणी भरताना पायाची शिर दुखते, तरीही तसेच पिण्यासाठी पाणी भरावे लागते.
- मालन भंडारी, नागरिक

अतिशय कमी दाबाने पाणी येते. इलेक्‍ट्रिक मोटार लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. चार तासांऐवजी दोन तासच पूर्ण दाबाने पाणी सोडल्यास सर्वांना पाणी मिळेल.
- रवींद्र साळुके, नागरिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji New Water Supply Scheme : इचलकरंजी शहरासाठी आता नवी पाणी योजना; राहुल आवाडेंनी सांगितला प्लॅन, मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीच्या सूचना

१५ लाखात तलाठी! लॅपटॉप अन् प्रशिक्षण पत्र देऊन फोटो काढले; बनावट आदेश काढत बेरोजगारांची फसवणूक

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

SCROLL FOR NEXT