Water 
पुणे

‘जल ही जीवन’चा सोसायट्यांना मंत्र

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजे नेमके काय, याची यंत्रणा कशी उभारावी आणि त्याचे महत्त्व काय, या बाबत सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम आयटीतील नोकरदार संदीप शिंदे करीत आहेत. सोसायट्यांमध्ये जाऊन ते रहिवाशांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे महत्त्व कार्यशाळेद्वारे पटवून देत आहेत. तसेच घरोघरी पत्रके वाटून ही यंत्रणा बसविण्यासाठी सोसायट्यांना ते उद्युक्त करत आहेत.  

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज असून, भविष्याच्या दृष्टीने सोसायट्यांनी त्याबाबत पावले उचलावीत, यासाठी  सोसायट्यांमधील रहिवाशांना जागृत करण्यासाठी संदीप यांनी ‘जल ही जीवन’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. कंचन स्टोन मेटल वर्क्‍स या कंपनीत विक्री व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या संदीप यांनी नुकताच लॅंडमार्क संस्थेचा स्व-परिवर्तन घडवून आणणारा कोर्स पूर्ण केला. त्याअंतर्गत त्यांनी हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा कशी बसवावी, यापासून त्यासाठी लागणाऱ्या खर्चापर्यंत... पावसाचे पाणी साठवण्याच्या प्रक्रियेपासून पाण्याच्या वापरापर्यंत...अशी सर्व माहिती सोसायट्यांपर्यंत पोचविण्याचे काम संदीप करत आहेत. आयटी क्षेत्रातील व्यग्र दिनक्रमातून काही वेळ ते सामाजिक उपक्रमासाठी देत असून, त्यांनी सोसायट्यांमध्ये घेतलेल्या कार्यशाळेला प्रतिसाद मिळत आहे. 

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता नागरिकांनी पाणी बचतीसाठी पावले उचलायला हवीत. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा त्याचाच एक भाग आहे. पावसाचे पाणी साठवून ते सोसायट्यांतील रहिवासी कधीही वापरू शकतात. म्हणून ही यंत्रणा बसवावी. 
- संदीप शिंदे, विक्री व्यवस्थापक, कंचन स्टोन मेटल वर्क्‍स 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Latest Marathi News Live Update : रंगपंचमी निमित्ताने पोलिसांकडून कोल्हापूर-गगनबावडा रोडवर वाहनांची तपासणी

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

SCROLL FOR NEXT