Water supply disrupted at Khadakwasla Inconvenience to citizens sakal
पुणे

खडकवासला येथील पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची गैरसोय

सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

निलेश बोरुडे

खडकवासला येथील पाणीपुरवठा विस्कळीत; मोटर नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय; सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

किरकटवाडी : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाला लागून असलेल्या खडकवासला गावातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. पंप हाऊस मधील मोटर नादुरुस्त झाल्याने नारिकांची गैरसोय होत आहे. सोमवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल अशी माहिती पालिकेच्या पर्वती विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी खडकवासला गावातील डीआयएटी रोड, जयहिंद नगर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, मुकाई नगर व कोल्हेवाडीच्या काही भागाला पाणीपुरवठा करणारी मोटर नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. तसेच खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते यांनीही नागरिकांसाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. पालिकेकडून मोटर दुरूस्तीसाठी विलंब होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

"तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पालिकेकडून दुरुस्तीसाठी होणारा विलंब पाहून ग्रामपंचायतीचा कारभार चांगला होता असे म्हणायची वेळ आली आहे. सौरभ मते यांनी टॅंकरने पाणी पुरवले नसते तर खुप हाल झाले असते."

- हेमांगी रविशंकर, जयहिंद नगर, खडकवासला.

"पालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.मोटर तात्काळ दुरुस्त करण्यात यावी. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे."

- सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.

"पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मोटर रिवाईंडिंग करण्याचे काम सुरू असून सोमवारपर्यंत पाणीपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात येईल."

- कनिष्ठ अभियंता, पर्वती विद्युत विभाग, पुणे मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT