Water supply esakal
पुणे

Water Supply : उपाय योजनांमुळे पुणे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत; महापालिकेचा दावा

पाणी बचतीसाठी महापालिकेने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणारा दक्षिण पुण्याचा भाग वगळता इतर भागात दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेलेले एअर वॉल्व्ह, दक्षिण पुण्यासाठी पाणी बंदचे केलेले स्वतंत्र नियोजन यामुळे गुरुवारी शहरातील पाणी बंद असले तरी आज शुक्रवारी बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला आहे असा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. तर बुधवार पेठ, धानोरकर कॉलनी, हिंगणे, नरवीर तानाजी वाडी, दत्तवाडी, औंध गाव यासह इतर भागात पाणी न येणे, पाणी कमी दाबाने येणे अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

पाणी बचतीसाठी महापालिकेने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणारा दक्षिण पुण्याचा भाग वगळता इतर भागात दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसात शहराच्या बऱ्याच भागात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठली होती.

या अनुभवावरून चालू आठवड्यात पाणी बंदच्या नियोजनात बदल केला. त्यात बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रभात रस्ता, शिवाजीनगर गावठाण, कर्वेनगर, वारजे, माळवाडी या भागात कायम त्रास असतो, तेथे आज पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

एकीकडे महापालिकेने पाणी पुरवठा सुरळीत झाला असला असे सांगितले जात असले तरी रास्ता पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, सदाशिव पेठेचा काही भाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोंढवा, शनिमंदिर दत्तवाडी, साने गुरुजी वसाहत आंबिल ओढा, सॅलिसबरी पार्क, बालेवाडी, गणेशखिंड रस्ता या भागात पाणी न येणे, कमी वेळ येणे, कमी दाबाने पाणी आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

‘आज सकाळी कमी दाबाने व अवघे पाऊस तास पाणी आले होते. त्यामुळे गैरसोय झाली. त्याची महापालिकेकडे तक्रार केली आहे.’

- अक्षय शिंदे, बुधवार पेठ

‘महापालिकेने एअर वॉल्व्ह बसवले, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र व्यवस्था केली त्यामुळे बऱ्यापैकी पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. ज्या भागात अडचणी आहेत तेथे उपाय योजना केल्या जात आहेत.'

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT