पुणे

पिंपरी शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने कमी होत आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून महापालिकेने आठवड्यातून एक दिवस कपात सुरू केली आहे. मात्र आता सोमवारपासून (ता. 6) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

धरणाची साठवणक्षमता 8.51 टीएमसी आहे. यंदा गुरुवारपर्यंतचा (ता. 2) धरणातील पाणीसाठा 2.52 टीएमसी म्हणजे 30 टक्‍क्‍यांपेक्षाही खाली आला आहे. गतवर्षी तो 3.18 टीएमसी होता. यामुळे जूनच्या मध्यापर्यंतच पाणी पुरेल, अशी स्थिती असल्याने 15 जुलैपर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे. याबाबत सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ""दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कपात केल्यास उंच भागात कमी पाणी मिळते. याचा विचार करून कपातीनंतर सर्व नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.'' जलसंपदा विभागातील पवना धरणाचे उपअभियंता ए. एम. गडवाल म्हणाले, ""धरणातील सध्याचा पाणीसाठा 25 जूनपर्यंत पुरणारा आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये धरण भरल्याने पाणी सोडावे लागले. त्यानंतर पाऊसच न झाल्याने पाणीसाठा कमी राहिला.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT