पुणे

कोल्हापूर:नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या आमदार यड्रावकर : शिरोळ जलजीवनअंतर्गत ४२ गावांतील कामांचा आढावा

CD

नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या ः आमदार यड्रावकर
--
शिरोळ जलजीवनअंतर्गत ४२ गावांतील कामांचा आढावा
--

शिरोळ, जि. कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी योजनांची कामे तत्काळ पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या. शिरोळ पंचायत समितीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शिरोळ, नांदणी, जुनेद, अतिग्रे तसेच अन्य गावांमध्ये नळ पाणी योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण केंद्र, पाईपलाईन टाकण्याची कामे, रस्ते दुरुस्ती आदी कामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आमदार यड्रावकर यांनी कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. ज्या गावांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अभियंते उपस्थित होते. नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT