पुणे

वाघोलीकरांच्या आंदोलनाला यश; पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

वाघोली (पुणे) : अनेक दिवसांपासून रखडलेल्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली. वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या वाढीव योजनेमुळे पाच एमएलटी पाणी वाघोलीला मिळणार आहे. 

22 कोटी रुपये खर्चून पीएमआरडीए ही योजना साकारणार आहे. निधी मंजूर करून व कामाची वर्क ऑर्डर देऊनही कामाला सुरुवात झाली नव्हती. तीन आठवड्यापूर्वी वाघोलीतील नागरिकांनी पीएमआरडीए  कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. तसेच, माजी खासदार शिवाजीराव आढळराव व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन अनेक मागण्या केल्या होत्या. ग्रामपंचायतही पाठपुरवठा करीत होती. अखेर या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे. सध्या वाघोलीची जी योजना आहे. त्यातून पूर्वीच्या लोकसंख्येलाच पाणीपुरवठा होतो. यामुळे सोसाट्यांना पाणी विकत घ्यावे लागते. त्याचा मोठा आर्थिक बोझा पडतो. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर सर्वांना पाणी मिळणार आहे. यामुळे सोसायटी धारकांचा आर्थिक बोझा कमी होईल. कामाला सुरुवात झाल्यानंतर आज जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी उपसरपंच रामकृष्ण सातव, माजी उपसरपंच संदीप सातव, सुनील जाधवराव, सागर गोरे, गणेश गोगावले, अनिल सातव, मच्छिंद्र सातव उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT