Water-Tanker 
पुणे

उपमहापौरांच्या प्रभागातच टॅंकरने पाणी

सकाळवृत्तसेवा

वाल्हेकरवाडी - येथील संत तुकारामनगर, ओंकार कॉलनी, ओम साई कॉलनीसह इतर भागात काही दिवसांपासून कमी दाबाने, अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ऐन नवरात्रोत्सवात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते टॅंकरने नागरिकांची तहान भागवत आहेत.

यापूर्वी दररोज सर्वांना पुरेल एवढा पाणीपुरवठा होत होता. परंतु, मागील काही दिवसांपासून कमी दाबासह अपुरा पुरवठा होत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. परिणामी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तसेच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. भांडी व कपडे धुण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तुकारामनगर, वाल्हेकरवाडी हा परिसर प्रभाग क्र. १७ मध्ये येतो. याच प्रभागातून उपमहापौर व एक नगरसेवक निवडून आले आहेत. तर, नगरसेविका ब प्रभाग अध्यक्ष असूनही, नागरिकांना पाण्यासाठी टॅंकर आणावे लागत आहे. उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे यांनी तत्काळ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

आठ दिवसांपासून तुकारामनगरमध्ये पाणी येत नाही. नवरात्रोत्सवात पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. त्यातच पाणीपुरवठा कमी दाबाने, तर कधी पाणीच येत नाही. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. 
- सचिन शिवले, नागरिक

जुनी पाइपलाइन असल्याने पाणीपुरवठ्यास अडथळा येत आहे. पाइपलाइनमधील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे.
- सुनील अहिरे, अभियंता, पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT