पुणे

जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत

CD

जेजुरी, ता. २० ः जेजुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. येथील सुवर्णस्टार सोशल क्लबच्यावतीने सुमारे ३५ हजार रुपये खर्चून येथील विंधन विहिरीवरील मोटर व इतर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा पाणी प्रश्न तात्पुरता मिटला आहे.
ग्रामीण रुग्णालयासाठी टॅंकरने पाणी घ्यावे लागत होते. दवाखान्यात बांधकामाच्या वेळी बोअर घेतली गेली होती. त्याला पाणी सुद्धा मुबलक होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कॉन्ट्रक्टर त्याची बोअर मोटर घेऊन गेले. सध्या टंचाईमुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.
येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुवर्णस्टार सोशल क्लबने येथील पाणी टंचाईची दखल घेतली. मंडळाचे अध्यक्ष रज्जाकभाई तांबोळी, अविनाश बारभाई व इतर पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची माहिती घेत पाठपुरावा सुरू केला. रुग्णालयात विंधन विहीर आहे. मात्र, मोटर नाही, अशी माहिती समोर आली. सुमारे पस्तीस हजार रुपये मोटर, पाइप लाईन, केबल या साहित्यांची जोडणी करून दिली. पाण्याची अडचण मंडळाच्या तत्परतेमुळे दूर झाली. रुग्णालयाच्या वतीने एक छोटा कार्यक्रम ठेवला. या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, पवार, मंडळाचे अध्यक्ष रज्जाकभाई तांबोळी, राजूशेठ बारभाई, प्रीतम बारभाई, महेश काळाने, अविनाश बारभाई, दत्ता सकट, बापू खोमणे, रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBA CET Result: एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीच्या सीईटीचा निकाल जाहीर; राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

Fine Art CET: कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर : सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल

Joy Street Event : चऱ्होलीत उद्या ‘जॉय स्ट्रीट’ची पर्वणी; ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळणार उत्साह, जल्लोष अन् आनंद

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकात आधार सेवा शिबिर

Gangapur Government Hospital : सरकारी रुग्णालयात माणुसकी मेली! प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर-नर्सनी दवाखान्यातुन हकलले

SCROLL FOR NEXT