water 
पुणे

पक्षी आणि प्राण्यांसाठी तयार केली पाणपोई 

रमेश मोरे

जुनी सांगवी - उन्हाळ्यात अन्न पाण्यावाचुन भटकी जनावरे, पक्षी यांचे हाल होतात. त्यामुळे असे पक्षी, प्राणी अन्नपाण्याच्या शोधात परिसर सोडुन स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे परिसरातील चिवचिवाट उन्हाळ्यात कमी होवुन परिसरात एक उजाड शांतता पसरते. परंतु, शहरात सिमेंटची जंगले, वृक्षांचा अभाव, दाट लोकवस्तीमुळे एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. माणसांसाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पहातो. मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवुन त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने खआस प्राण्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे. या पाणपोईत दुस-याच दिवशी रस्त्यावरून जाणा-या प्राण्यांनी आपली तहान भागवली.

याबाबत प्रतिष्ठानचे दत्तात्रय भोसले म्हणाले, वाढत्या उन्हामध्ये मुक्या जनावरांची दिवसभराची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने ही पाणपोई केली आहे. तसेच पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यात आले आहे. 

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्राणिमित्र दत्तात्रय भोसले म्हणाले, शहरात उन्हाळ्यात दिवसभर फिरणाऱ्या गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कावळे, चिमण्या आदिंची पाणी पिण्याची सोय या पाणपोईमुळे झाली. तसेच त्यांचा अधिवास टिकून रहावा यासाठी ही पाणपोई सुरु केली आहे. यासाठी विजयसिंह भोसले, कैलास सुर्यवंशी, हनुमंत पवार, व कार्यकर्ते या पाणपोईत रोज पाणी भरतात. त्यामुऴे प्राणी ठरलेल्या वेळेत सकाळी, दुपारी व संध्याकाळी पाणवठ्यावर येत असल्याचे भोसले यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

Latest Marathi News Update: जळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

SCROLL FOR NEXT