NCP-BJP
NCP-BJP 
पुणे

पिंपरीतील पाण्याच्या टाकीचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील विकासकामांच्या उद्‌घाटनावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ राजकीय श्रेयवाद सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी केली जात असून, त्याचा पोरखेळ चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिकेत १९९८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. २०१७ च्या निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. सध्या भाजपमध्ये असलेले बहुतांश पदाधिकारी पूर्वीचे राष्ट्रवादीचे आणि १९९८ पूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवून भाजपने महापालिका ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मंजूर अथवा भूमिपूजन झालेली कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. काही पूर्ण झाली आहेत. त्यांची उद्‌घाटने सत्ताधारी म्हणून भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून उद्‌घाटने उरकली जात आहेत. याचा प्रत्यय मंगळवारी (ता. ७) पिंपरी गावातील पाण्याच्या टाकीच्या उद्‌घाटनानिमित्त आला. 

सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांच्या हस्ते उद्‌घाटन केले. माजी महापौर संजोग वाघेरे, प्रभाकर वाघेरे उपस्थित होते. त्यानंतर एक तासाने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते टाकीजवळ आले. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन केले. या प्रभागाचे प्रतिनिधित्व भाजपचे संदीप वाघेरे, राष्ट्रवादीच्या उषा वाघेरे, निकिता कदम व डब्बू आसवानी हे नगरसेवक करीत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन उद्‌घाटन करणे गरजेचे होते. मात्र, दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ एकमेकांवर राजकीय कुरघोडी करीत स्वतंत्रपणे उद्‌घाटन 
केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT