पुणे

शिरवळवाडी तलावावर वीज चोरून विद्युत पंप द्वारे पाण्याची चोरी

CD

शिरवळवाडी तलावातील पाण्याची चोरी; दहा गावांवर टंचाईचे सावट
तलावात केवळ १५ टक्के पाणीसाठा; वीज चोरून उपसा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
वागदरी, ता. २२ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी साठवण तलावातून डीपीमधील वीज चोरून विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तलावात केवळ १५ टक्के पाणीसाठा असल्याने शेतीसाठी होणारा पाणी उपसा न थांबल्यास वागदरीसह परिसरातील गावांमध्ये भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरी, नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. पाण्याची पातळीही खोल गेली आहे. अशा परिस्थितीत वागदरी, शिरवळ, शिरवळवाडी, सदलापूर, हिरोळी, सरसंबी आणि बनजगोळसह परिसरातील सुमारे दहा गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शिरवळवाडी साठवण तलाव महत्त्वाचा आहे.
पावसाअभावी तलावात पाण्याची आवक झाली नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाणी वापरावर बंधने घालण्यात आली असून, परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. तरीही काही शेतकरी डीपीमधून वीज चोरी करून पाणी उपसा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित जलसंपदा व पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
तलावातील पाण्याचा शेतीसाठी होणारा उपसा थांबवावा, तलाव परिसरातील वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करावा, तसेच वीज चोरी करून पाणी उपसा करणाऱ्यांची विद्युत उपकरणे व केबल जप्त करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वागदरीचे प्रशासक व माजी सरपंच शिवानंद घोळसगाव, सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत आणि शिरवळच्या सरपंच बिराजदार यांनी केली आहे. पाणी चोरी थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT