crime sakal
पुणे

विहिरीचे पाणी न विचारता घेणे पडले महागात, चौघांवर पाणी चोरीचा गुन्हा

विहिरीचे पाणी न विचारता घेत असाल तर सावधान

चिंतामणी क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा

वडगाव निंबाळकर : शेजाऱ्याच्या शेतातील विहिरीचे पाणी न विचारता घेत असाल तर सावधान... कारण बारामती तालुक्यातील सुपे येथील चौघांवर पाणी चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सुधाकर तुकाराम रोकडे रा. बदलापूर पुर्व ता. अंबरनाथ जि. ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये बारामती तालुक्यातील सुपे येथील प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहुल ज्ञानेश्वर जाधव, अतुल ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर पाणी चोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी रोकडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत त्यांची वडिलोपार्जित जमीन सुपे येथे आहे. कोरोना महामारीमुळे गावाकडे आले नव्हते. फिर्यादी परगावला असल्याचे पाहून आरोप ठेवण्यात आलेल्या वरील चौघांनी बांधालगत असलेल्या रोकडे यांच्या विहिरीवर त्यांच्या संमतीशिवाय वीज जोड घेऊन विद्युत पंप लावला. फिर्यादी गावचे यात्रेनिमित्त गावात आले यावेळी शेतावर गेले असता आपल्या शेतातून शेजाऱ्यांनी पाणी घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ दमदाटी केली.

लॉकडाऊन मुळे रोकडे गावी येत नसल्याचा फायदा घेतला. रोकडे कुंटुंबातील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. गावातील जमिनीकडे झालेले दुर्लक्ष पाहून शेजारील बांधकऱ्यांनी बेकायदा संमतीशिवाय शेतातील पाणी चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT