Water Waste Sakal
पुणे

Water Waste : टंचाईच्या झळा, पाणी मात्र रस्त्यावर; कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया

कात्रजसह दक्षिण पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र पाणीगळती थांबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.

अशोक गव्हाणे

कात्रज - कात्रजसह दक्षिण पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र पाणीगळती थांबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर 'शिवशंभोनगर गल्ली क्रमांक ३ अ'च्या समोरील बाजूस मागील तीन ते चार दिवसांपासून पाणीगळती होत आहे. मात्र, ही पाणीगळती थांबविण्यात आलेली नाही. पाणी सोडण्याच्या वॉल्व्हमधून ही गळती होत आहे. हे पाणी पुढे वाहत जावून यशश्री सोसायटीच्या रस्त्यावर साचत असल्याचे दिसून येते.

मार्च महिना संपत आला असून उन्हाची धग वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. मात्र, प्रशासनाचा गाफीलपणा समोर येत असून अनेक ठिकाणी अशाप्रकारे होत असलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. उन्हाळ्यामध्ये अशाप्रकारे पाणीगळती होत असताना प्रशासनाकडून ही पाणी गळती थांबविण्यासाठी काहीही उपाय योजना का करण्यात आल्या नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशा प्रकारे होत असलेलली पाणीगळती थांबविल्यास पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दक्षिण पुण्यातील नवीन समाविष्ट गावे, वाड्या वस्त्यांसह कात्रज परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. एकीकडे पाणीपुरवठा सुरळीत होत नसताना या पाणीगळतीला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रतिक्रिया

पाणी सोडण्याच्या वॉल्व्हमधून पाणीगळती होत असेल तर त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. हा रस्ता रहदारीचा असून अवजड वाहनांमुळे लिकेज होऊन पाणीगळती होते. मात्र, आम्ही त्याठिकाणी पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करु.

- विज्ञान गायकवाड, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा

उन्हाळा डोक्यावर आणि यंदा पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर दिसून येत असताना मात्र हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया घालविणे कितपत योग्य आहे? हा पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीणा असून याकडे लक्ष देत तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

- विशाल देशपांडे, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?

SCROLL FOR NEXT