पुणे

पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही - बापट 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""पुणेकरांना पुरेसे पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे पाणी कमी पडणार नाही, असे खासदार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करून, त्यातून पूर्व भागासाठी अपेक्षित पाणी मिळणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. 

कोंढवा येथील लुल्लानगर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभारलेल्या उड्डाण पुलाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक नाना भानगिरे आदी उपस्थित होते. पुणेकरांना चांगल्या सेवा पुरविण्यासाठी आखलेले प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी आणि त्याचे परिणामही बापट यांनी या वेळी सांगितले. 

ते म्हणाले, ""शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जागोजागी उड्डाण पूल उभारले आहेत. त्यातील बहुतांशी प्रकल्प मार्गी लागले असून, उर्वरित पुलांचे काम हाती घेतले जाईल. मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे नियोजन आहे. नव्या गावांना ही सेवा जोडण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकल्प पूर्ण केले जातील. याकडे पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यावे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT