dimbhe dam.jpg 
पुणे

आंबेगाव, जुन्नर, शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी : डिंभे धरण भरण्याच्या मार्गावर

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) :  आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात 10  दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे डिंभे धरणात  ८९.१२ टक्के (११.१३ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. नदी, नाले व ओढे भरून वाहत आहेत. भाताची 5200 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली असून भात रोपे तरारली आहेत. 11 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत धरणात तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'श्रीगणेशा'!​

डिंभे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा साडेबारा टीएमसी आहे. या पाणी साठ्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका येथील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. आंबेगाव तालुक्यात डिंभा धरण असले तरी या धरणातील पाण्याचा उपयोग आंबेगाव बरोबरच जुन्नर, शिरूर तालुक्यांना होतो. कामगार मंत्री वळसे पाटील यांच्या योग्य सुचनेमुळे येथील शेतकऱ्यांवर कधीही दुष्काळ पाहण्याची वेळ आली नाही. हेच पाणी नगर व सोलापूर जिल्ह्याला जाते. नगर व सोलापूर हे दुष्काळे तालुके आता या पाण्यामुळे 8 माही बागायती झाले आहेत. यावर्षी योग्य नियोजन केल्याने धरणात 1 जूनला 20 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यात चार धरणे असली तरी या सर्व धऱणांची पाणी साठवण क्षमता डिंभे पेक्षा कमी आहे. नगर व सोलापूरलाही कोणतीही तक्रार न करता पाणी सोडले जाते. डिंभे धरण दरवर्षी 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण भरते असा इतिहास आहे. धरणातील पाणी साठ्यामुळे येथील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. डिंभे धरणात 11 ऑगस्ट ४७.८६ टक्के, 14 ऑगस्ट रोजी ५७.३१ टक्के, २३ ऑगस्ट रोजी ८९.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात आज आखेर 693 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवसा पर्यंत  १३७७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. येथील भात शेती व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात. आहुपे, भीमाशंकर, पाटण खोऱ्यात ओढे नाले भरून वाहत असल्याने डिंभे धरणात पाण्याची आवक पाऊस थांबला असला तरी सुरूच आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT