पुणे

मदरसा सेवा आयोग विलीनीकरण प्रक्रिया सुरू

CD

कोलकता, ता. ८ (पीटीआय) : पश्चिम बंगाल सरकारने मदरसा सेवा आयोग रद्द करून त्याचे राज्याच्या शाळा सेवा आयोगात (डब्लूबीएसएससी) विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या आयोगाच्या माध्यमातून मदरशांमधील शिक्षकांची भरती करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. यासंदर्भातील निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विधिमंडळात आवश्यक कायदेशीर बदल करावे लागतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकार मदरसा सेवा आयोग रद्द करणार असल्याचे सांगितले होते. आता त्याचे पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगात (डब्ल्यूबीएसएससी) विलीनीकरण केले जाईल,’’ असे अधिकारी यांनी म्हटले होते. शालेय शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, यासाठी विधानसभेत दोन स्वतंत्र विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. यापैकी एका विधेयकाद्वारे पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव असेल, तर दुसऱ्या विधेयकाद्वारे डब्लूबीएसएससी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याचा प्रस्ताव असेल.
शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासाठी आणि त्यात अधिक एकसमानता आणण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT