Adar_Poonawalla
Adar_Poonawalla 
पुणे

कोरोनाच्या लसीबाबत आदर पूनावाला यांचा खुलासा; म्हणाले 'सरकारची परवानगी...'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन परवानगीची मागणी आम्ही सरकारकडे केली. त्यासंबंधीच्या चाचण्यांची आवश्‍यक सर्व माहिती आणि अहवाल आम्ही औषध नियंत्रनालयाकडे दिला आहे.

लोकांची सुरक्षिततेला प्राधान्य असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर असलेल्या या क्‍लिष्ट माहितीच्या खातरजमेसाठी वेळ लागणार आहे. मात्र, आमची सर्व तयारी पूर्ण झाली असून आम्ही फक्त परवानगीची वाट पाहत आहे, असा खुलासा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केला. 

सोमवारी (ता.२८) त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा खुलासा त्यांनी केला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन ऍस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट करत आहे. ऍस्ट्राझेनिकानेही ब्रिटन सरकारकडे अहवाल सादर केले असून ते सुद्धा परवानगीची वाट पाहत आहेत.

कोविशिल्ड लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के लसी या भारतासाठी राखीव असल्याचे पूनावाला यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. सध्या त्यांच्याकडे 4 ते 5 कोटी लसींच्या उत्पादनाची क्षमता असून, मार्च महिन्यापर्यंत ही क्षमता 10 कोटीपर्यंत जाईल, जानेवारीमध्ये परवानगी मिळेल असा आम्हाला विश्वास असल्याचे, पूनावाला यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडे सध्या 5 कोटी डोस स्टॉकमध्ये आहेत. काही दिवसामध्ये आम्हाला नियामक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र सरकारला ठरवायचं आहे की किती लवकर आणि किती लशीचे डोस ते घेऊ शकतात. जूलै 2021 पर्यंत आम्ही जवळपास 30 कोटी कोरोना लशीचे डोस तयार करु, असं अदर पुनावाला म्हणाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT