पुणे

फळपीक विमा योजनेत सहभागाचे आवाहन

CD

वडापुरी, ता. १५ : नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक आधार मिळवण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, पपई, नारळ व अंजीर या सात फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. गरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा नोंदणीची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे आहे: द्राक्षासाठी १५ ऑक्टोबर, केळी, पपई व नारळासाठी ३१ ऑक्टोबर, अंजीरासाठी ३० नोव्हेंबर, आंब्यासाठी ३१ डिसेंबर आणि डाळिंबासाठी १४ जानेवारी २०२७.
या ऐच्छिक योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतात. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. विम्यासाठी किमान २० गुंठे उत्पादनक्षम क्षेत्र आवश्यक असून, कमाल मर्यादा चार हेक्टर आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच हे संरक्षण मिळेल. योजनेसाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधारकार्ड, बँक तपशील, ७/१२ उतारा, जिओटॅग फोटो व डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) नोंद आवश्यक आहे.
२०२५-२६ च्या आंबिया बहार हंगामात जिल्ह्यातील १७६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ११२ शेतकऱ्यांना ५३.२५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. शेतकऱ्यांनी ई-सेवा केंद्र, बँक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन दिपक गरगडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT