पुण्यात जानेवारी ठरला कमी थंडीचा महिना Sakal
पुणे

Pune Weather Update : पुण्यात जानेवारी ठरला कमी थंडीचा महिना; किमान तापमान दोन वर्षांतील सरासरीपेक्षा जास्त

थंडीचे दिवस कमी झालेच पण, किमान तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा जास्त नोंदला, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे शहरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारी उबदार ठरला. थंडीचे दिवस कमी झालेच पण, किमान तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा जास्त नोंदला, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

पुण्यातील शिवाजीनगर येथील वेधशाळेत २०२१ मध्ये जानेवारीतील नीचांकी तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यावर्षी पुण्यात जानेवारीतील पाचवे उच्चांकी किमान तापमान १८ जानेवारीला (१८.१ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. त्या वर्षात जानेवारीमध्ये एकही दिवस किमान तापमानाचा पारा एक अंकांपर्यंत खाली घसरला नसल्याचेही हवामान खात्यातर्फे दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते.

पुण्यात २०२१च्या जानेवारीमधील तुलनेत २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांमध्ये थंडीचे दिवस वाढले. या दोन्ही वर्षी सहा दिवस किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला होता.

जानेवारी २०२२ मध्ये किमान तापमान ८.५ आणि २०२३ मध्ये ७.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला होता. यंदा जानेवारीमध्ये अवघे दोन दिवस थंडी होती. त्यात किमान तापमानाचा पारा ८.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला गेला. हे यंदाच्या जानेवारीतील नीचांकी किमान तापमान ठरले.

पुण्यात २०२१ मध्ये जानेवारीतील किमान तापमानाची सरासरी १५.७ अंश सेल्सिअस होती. हे २०२१ ते २०२४ या वर्षांमधील सर्वाधिक उबदार वर्ष ठरले. मात्र, त्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये किमान तापमानाची सरासरी १२.४ (२०२२) आणि १२ (२०२३) अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाली.

या वर्षी पुन्हा १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची सरासरी वाढली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा जानेवारी उबदार ठरल्याचे खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

थंडीचे दिवस का कमी झाले?

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुण्यासह महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण होते. या वर्षी उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी राहिला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे आहे.

थंडीचे दिवस कमी होण्याचा आणि प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह असलेल्या ‘एन निनो’चा काही संबंध आहे का, याबद्दल संशोधन होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT