weather update alert Monsoon likely to arrive Kerala ahead of time Sakal Digital
पुणे

वेळे आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

बळीराजासाठी एक आनंदाची बातमी... यंदा नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेळे आधीच केरळमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बळीराजासाठी एक आनंदाची बातमी... यंदा नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेळे आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी वर्तवली आहे. या अंदाजात मागे-पुढे ४ दिवसांचा फरक असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १२) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्यासाठी हवामान पोषक झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (ता. १५) दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

तर शुक्रवारी (ता. १३) हवामानशास्त्र विभागाने केरळमध्ये मॉन्‍सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकते. सांख्यिकीय मॉडेलच्या माध्यमातून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. साधरणपणे मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी तीन दिवस उशिरा मॉन्‍सून केरळमध्ये दाखल झाले होते. तर यंदा पाच दिवस आधी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान १४ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. एकीकडे उन्हाचा वाढता कडाका, असह्य उन्हाच्या झळा यामुळे अंगाची लाही लाही झाली होती. दरम्यान यंदा मॉन्सूनचे आगमन वेळे आधी होत असल्याने बळीराजाला देखील दिलासा मिळणार आहे. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, आग्नेय हिंद महासागरात वाहणारे वारे, हिंद महासागरातील वारे आदी घटकांचा अभ्यास करत हा मॉन्सूनचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याच्या अंदाज

वर्ष : प्रत्यक्ष आगमनाची तारीख :आगमनाचा अंदाज

२०१७ ः ३० मे ः ३० मे

२०१८ ः २९ मे ः २९ मे

२०१९ ः ८ जून ः ६ जून

२०२० ः १ जून ः ५ जून

२०२१ ः ३ जून ः ३१ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT