Lightning strikes near the girls hostel at Avsari Khurd pune
Lightning strikes near the girls hostel at Avsari Khurd pune  sakal
पुणे

आंबेगाव : अवसरी खुर्द येथे मुलींच्या वसतिगृहा जवळ वीज कोसळली

डी. के वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द, शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ गुरुवारी(ता,9) संध्याकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह पाऊस झाला. महाविद्यालयाच्या मागील बाजूला मुलींच्या वसतिगृह जवळच वीज कोसळली. मोठा आवाज झाला. यावेळी टेरेस वर व व्हरांड्यात गप्पा मारत असलेल्या व मोबाईल मध्ये पावसाचे चित्रीकरण करत असलेल्या मुलींमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली त्यांनी ताबडतोब खोल्यांमध्ये पळ काढला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

याबाबत पूर्वाली काकड (अकोले) व समृद्धी कान घुले ( पुणे) या विद्यार्थिनींशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या" पहिलाच पाऊस असल्यामुळे गारवा निर्माण झाला होता. अनेक मुली टेरेस व व्हरांड्यात उभे राहून निसर्गरम्य वातावरणाचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करत होत्या. अचानक पणे मोठा आवाज होऊन क्षणातच आमच्यापासून 400 मीटर अंतरावर वीज कोसळली. मोठा प्रकाश पडला. अनाहूत पणे उदभवलेल्या प्रसंगामुळे आमची धांदल उडाली. आम्ही खोल्यांमध्ये जाऊन बसलो. सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. नशीब बलवत्तर होते म्हणून आम्ही वाचलो.

परमेश्वराचे आभार मानले दरम्यान पिंपळगाव , गावडेवाडी येथेही पाऊस व वादळ झाले. पिंपळगाव येथे तर अनेक घरांची कवले उडून गेली. त्यामुळे घरात पावसाचे पाणी आल्याने धान्य कपडे व ग्रह उपयोगी वस्तू चे नुकसान झाले आहे अशी माहिती पिंपळगाव येथील युवा सेनेचे नेते सचिन बांगर यांनी सांगितल अवसरी खुर्द ( ता आंबेगाव) :शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञानिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहा जवळ वीज कोसळल्याने मुलींमध्ये घबराट निर्माण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT