weather update season mercury in city is 8 degrees people of Pune felt cold even in day sakal
पुणे

Weather Update : मोसमात दुसऱ्यांदा शहरातील पारा ८.९ अंशांवर; पुणेकरांनी दिवसाही अनुभवली थंडी

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी वाढत चालली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोसमात दुसऱ्यादा पुणे शहरातील किमान तापमान ८.९ अंश सेल्सिअसवर पोचले असून, पुन्हा एकदा थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शनिवारी पहाटे जळगाव आणि औरंगाबादनंतर राज्यातील सर्वात जास्त थंडी पुण्यात नोंदविली गेली. २१ नोव्हेंबरला शहरातील किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडली होती. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ जरी असले, तरी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी वाढत चालली आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत होती.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातही सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कायम असून, मुंबईसह कोकणातही पारा घसरला आहे. उत्तर भारतात बहुतांश भागांत थंडीची तीव्र लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील थंडीत मोठी वाढ झाली आहे. मंगळवार (ता.१३) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहून दूपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

शिवाजीनगर : ८.९

पाषाण : १०.१

लोहगाव : १२.७

चिंचवड : १५.७

लवळे : १७.२

मगरपट्टा : १५.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT