help11 
पुणे

भारीच की ! मदतीच्या गुणाकारासाठी संकेतस्थळ... 

सकाळवृत्तसेवा

बालाजी नगर : पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात लॉकडाउनमुळे ग्रासलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरुण इंजिनिअर आणि डॉक्‍टर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी https://reliefpune.in/ नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर त्यांनी विभागवार मदत करणारे, देणगीदार आणि गरजू यांची माहिती आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. 

लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणारे, बेघर, स्थलांतरित मजूर, वयोवृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथी आदी लोकांचे रोजचे जगणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, समाजसेवक त्यांना मदत करत आहेत. पण मदत करणाऱ्यांना गरजू नेमके कोणत्या भागात आहेत? तर देणगीदारांना देणगी कुठे द्यायची? हा प्रश्न पडतो. त्यामुळे काही डॉक्‍टर आणि इंजिनिअर यांनी मिळून https://reliefpune.in/ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मदत करणारा आणि गरजू यांना जोडण्याचे काम हे संकेतस्थळ करते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना रिलिफ पुणे गटाचे रविकांत पाटील म्हणाले, गरजूंपर्यंत पोचून प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना त्यांच्या भागातील देणगीदार आणि 
इतर मदतकार्य करणाऱ्यांचा या संकेतस्थळावर शोध घेता येईल. त्यांच्या सोबत भागीदारी करता येईल. तसेच गरजूंना त्यांच्या भागातील मदतीचा देखील येथे शोध घेऊन संबंधितांना संपर्क करता येईल. तसेच आम्ही कोणतीही देणगी स्वीकारत नाही. या संकेतस्थळाच्या मार्फत तुम्ही थेट गरजूंपर्यंत देणगी पोचवू शकता. असे ही पाटील यांनी सांगितले.  

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये 
१. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मदत करणाऱ्यांची २०० हून अधिक माहिती व संपर्क क्रमांक. 
२. किराणा, जेवण, निवारा, साबण-सॅनिटायझर, पीपीई, घरपोच सेवा, वाहनसेवा, आरोग्यसेवा, हेल्पलाईन आदींचा समावेश. 
३. देणगी(वस्तू, धान्य, पैसे, स्वयंसेवक आदी) देऊ इच्छिणाऱ्या लोकांची यादी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT