बिबवेवाडी : स्वरांजली बँड पथकाचे संग्रहित छायाचित्र sakal
पुणे

यंदाच्या लग्नसराईत मंगल वाद्यांचे सूर घुमणार, बँड वादकांची दिवाळी गोड

बँड वादकानवर उपासमारीची वेळ

नितीन बिबवे

बिबवेवाडी : गेली पावणे दोन वर्षे कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले होते, राज्य सरकारने अनेक खाजगी व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले होते त्यामुळे गेली दोन वर्षे लग्नसराईत लॉक डाउन होते बँड वादकानवर उपासमारीची वेळ आली होती, परंतु यंदाच्या दिवाळी नंतर सुरु होणाऱ्या लग्नसराईच्या अगोदर राज्य सरकारने टप्याटप्याने कार्यक्रमावरील निर्बंध उठवले आहेत त्यामुळे बँड पथकांना चांगली मागणी असून अनेक नागरिकांनी आगाऊ बुकींग केले आहे त्यामुळे बँड वादकांमध्ये आनंदी वातावरण असून यावर्षी ची दिवाळी गोड होणार आहे.

शहरातील नाट्यगृहे नुकतीच सुरू करण्यात आली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला उपस्थिती होते त्यावेळी पुणे बँड कला विकास प्रतिष्ठान ( बँड मालक संघ ) चे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी पवारां समोर बँड पथकांवरील निर्बंध उठवण्याबाबत मागणी केली त्यावेळी अजित पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम खुले करत आहोत त्यानुसार बँड पथकांवरील निर्बंध कमी करत वादनाला मुभा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून प्रतिष्ठान तर्फे प्रशासनाचे आभार मानण्यात आले यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आढाव, चेतन ववले, अशोक तुपे, फिरोज खान, सुवन गवळी, हेमंत माने, गौरव वाडेकर, औदुंबर शिंदे, श्रीपाद सोलापूरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT